Ad will apear here
Next
रत्नागिरीतील पहिल्या फिशिंग टुर्नामेंटला चांगला प्रतिसाद


रत्नागिरी :
रत्नागिरीत प्रथमच ‘ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट’ दोन डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती. कोकण फिशिंग अँगलर्स फोरमतर्फे भाट्ये किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अशा एकूण ४५ जणांनी भाग घेतला होता. मुंबईचे रणजित खानविलकर, मुंबईचे नितेश कोळवणकर आणि रत्नागिरीतील मिऱ्या गावचे संतोष सावंत या तिघांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

खेडच्या दत्ता पदमुले यांना ‘अँगलर ऑफ दी इयर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मांडवीच्या केतन भोंगले यांना ‘फर्स्ट फिश कॅचर’ म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या १२ वर्षांच्या जय मंदार जाधव याला ज्युनियर अँगलर म्हणून सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या विश्वा दरणे या मुलीनेही लक्षवेधक कामगिरी केली. 



या स्पर्धेत माशांच्या जातीनुसार व लांबीनुसार गुणांक ठरविण्यात आले होते. पकडलेल्या माशांना लगेच पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. सर्व  विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, फिशिंगची विविध उपकरणे आणि प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अन्य सहभागी स्पर्धकांना ‘ओपन सर्फ फिशिंग टुर्नामेंट’चे टी- शर्ट आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, भाट्ये गावाचे सरपंच पराग भाटकर, नगरसेवक सुदेश मयेकर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कोकण फिशिंग अँगलर्स फोरमचे पराग वाडकर, ओंकार शिवलकर, मंदार जाधव, दत्ता पदमुले, वैभव कदम, नितेश कोळवणकर, मयूर झिंगे, आशुतोष शेलार यांनी विशेष मेहनत घेतली.

बेंगळुरूमधून मार्कस ग्रीनवुड या स्पर्धेला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. पेलेजिक ट्राइब आणि मस्ताड या कंपन्यांनी बक्षिसे प्रायोजित केली होती. या प्रायोजकत्वाकरिता पराग वाडेकर यांनी डेरेक डिसूझा यांचे विशेष आभार मानले. या स्पर्धेला रत्नागिरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYMBV
Similar Posts
तटरक्षक दलाच्या पुढाकाराने भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील विभागाने दर वर्षीप्रमाणे यंदाही पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छतादिनी रत्नागिरीमधील भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनी तटरक्षक दलातर्फे भाट्ये किनाऱ्याची स्वच्छता रत्नागिरी : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील केंद्राने पुढाकार घेऊन २१ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सागरकिनारा स्वच्छता दिन साजरा केला. रत्नागिरीमधील भाट्ये किनाऱ्यावर सकाळी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात रत्नागिरीतील ईकरा पब्लिक स्कूल, फिनोलेक्सचे
रत्नागिरीत ‘झिपलाइन’ला मुलांचा प्रतिसाद रत्नागिरी : रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनी भाट्ये पुलावरून भाट्ये किनार्‍यापर्यंत झिपलाइन या गिर्यारोहणातील साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन केले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थेने अनेक साहसी उपक्रम हाती घेतले आहेत.
भाट्ये किनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट दाखल रत्नागिरी : तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे हॉवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना १० जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर दाखल झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ जानेवारीला सकाळी या हॉवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language